-->
आपला महाराष्ट्र 24

जय भवानी मित्र मंडळ यांच्या माध्यमातून करावे सीवूड्स महोत्सव याची सुरुवात

करावे नवी मुंबई - नवी मुंबई प्रांतातील सर्वात सुशिक्षित व अग्रेसर असे करावे गाव हे एक होय. या ऐतिहासिक भूमी असलेल्या गावातील जय भवानी मित्र मंडळ आणि समाजसेवक नगरसेवक व नागरिक यांनी करावे गाव सी वूड्स महोत्सव 2022 या भव्य दिव्य उत्सवाची सुरुवात केली. आणि विशेष करून हा उपक्रम पहिल्यांदाच राबवला गेला आहे अशी जनमानसात चर्चा होत आहे . एकूण 11 दिवस चालणाऱ्या या करावे महोत्सवात अनेक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये साई भजन महाराष्ट्राची परंपरा सांगणारे लोकधारा , लावणी लोकगीते लहान मुलांसाठी डान्स तसेच साइ लीला व इतर उपक्रम सुद्धा राबविण्यात येत आहे. आणि दर दिवशी एक विशेष कार्यक्रम अशी या उत्सवाची रचना आहे. 7 डिसेंबर पासून सुरु झालेल्या या उत्सवात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. त्यापैकी करावे गावातील माजी सरपंच माजी नगरसेवक व समाजसेवक हे उपस्थित होते रवींद्र नाईक विनोद म्हात्रे गणेश म्हात्रे त्याचप्रमाणे समीर बागवान संतोष दळवी अमित मांडवी विशाल विचारे व सुखदेव तांडेल यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते विजय नाटक यांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली अशाप्रकारे आनंदाने सुरुवात झालेला आहे या करावे सीवूड महोत्सव 2022 प्रथमच आयोजित उत्सवात सर्व नागरिकांनी भाग घ्यावा असे जय भवानी मित्र मंडळ यांनी जनतेस आवाहन केले आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.