-->
आपला महाराष्ट्र 24

श्री क्षेत्र पाटणोली येथे परशुराम प्रतिष्ठान रोजगार App चा भव्यदिव्य असा शुभारंभ



उरण (सुनिल ठाकूर ).
आज दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी श्रीक्षेत्र पाटणोली (पनवेल) येथे पुष्पा परशुराम प्रतिष्ठान रोजगार App चा भव्यदिव्य असा शुभारंभ भागवताचार्य महेशजी महाराज साळुंखे ह्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. पुष्पा परशुराम प्रतिष्ठान चे संचालक/अध्यक्ष अतुल भगत साहेब ह्यांनी उरण व पनवेल परिसरातील सर्व बेरोजगारांना आवाहन केले आहे की सर्वांनी ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे.

खाली दिलेल्या लिंकद्वारे आपण आपला BIODATA आमच्यापर्यंत पोहचवु शकता.

https://pushpa-parshuram-pratishthan.com/

21 व्या शतकातील जगातील सर्वात मोठ्या नियोजित शहरांपैकी एक म्हणजे आपली नवी मुंबई. सिडकोने भूसंपादन करून केलेल्या या नवी मुंबई प्रकल्पामध्ये JNPT बंदर (भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर) व त्यावर आधारित CFS, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र- SEZ, ONGC, BPCL आणि TTC (Trans Thane Creek) MIDC यांचा समावेश आहे.
या प्रकल्पांमुळे, हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या आणि होणार आहेत . पण दुर्दैव असे कि स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य न देता बाहेरून भरती केली जाते. नंतर हेच बाहेरुन आलेले अधिकारी स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना त्रास देण्याचे व अडचण निर्माण करण्याचे काम करतात.
हे सगळे थांबवण्याचे उद्दिष्ट, “पुष्पा परशुराम प्रतिष्ठान”, या संघटनेचे आहे. प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना, आपल्याच जमिनीवर निर्माण केलेल्या प्रकल्पांमध्ये नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. नोकऱ्या मिळवण्यासाठी एक संघटित आणि प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना विनंती आहे कि तुम्ही वरील लिंकद्वारे अर्ज भरून द्यावे. तुमची माहिती व Biodata कंपन्यांकडे पोचवून तुम्हाला रोजगार मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुढील माहिती तुमच्या रजिस्टर नंबरवर देण्यात येईल.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.