उरण (सुनील ठाकूर)
जिल्हा परिषद शाळा केतकी नं.१ ची विद्यार्थीनी श्रृती नितीन सैतवडेकर हीच्या अंगी असलेल्या चित्र कलेचे गुण हेरले आणि तीला त्यात प्रोत्साहित केले . त्या नुसार रोज एक चित्र ती रेखाटत गेली. चित्र काढता काढता ती उत्तम चित्र रेखाटू लागली.
शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तीला तिची काही चित्रे " ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड"आयोजित
ग्रेट चाईल्ड आर्टिस्ट अवॉर्ड २०२२ साठी पाठवली त्यातून तीची दोन चित्रांची निवड होऊन पु.ल.देशपांडे कला अकादमी प्रभादेवी , मुंबई येथे दि.२३/१२/३०/२०२२ ते २५/१२/२०२२ अखेर प्रदर्शनात लावण्यात आले होते.
एका ग्रामीण भागातून म्हणजे केतकी सारख्या एका खेड्यातून इयत्ता पाचवी ची विद्यार्थीनी श्रृती सैतवडेकर हीने रेखाटलेले चित्र मुंबई येथील कला दालनात प्रदर्शनात लागणे हे फार मोठे गौरवास्पद गोष्ट आहे. एका सामान्य कुटुंबातील ही मुलगीचे एका मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांच्या रांगेत बसणे फार कौतुकास्पद आहेत.
विद्यार्थ्यांनी गुणांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा शोध घेऊन अशा विद्यार्थ्याना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात स्टेज निर्माण करून देण्याचे काम श्री. जयकुमार व्यवहारे आणि सौ. गीतांजली मोयानक या शिक्षकांनी फार मोलाचे कार्य यशस्वी केलेले दिसून येते.
श्रृती नितीन सैतवडेकर हिच्या कलेची दखल घेऊन प्रोपेसर सिनियर फॅकल्टी मेंबर सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मुंबई,
मिस्टर हिरामन पाटील प्रेसिडेंट बृहण मुंबई कला अकादमी, मिस्टर जय सैयलन आर्टिस्ट आणि अनिमीटर मेंटोर अँड फ्लिम मेकर यांच्या हस्ते मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
अत्यंत वयानी लहान असल्याने श्रृती सैतवडेकरचे कला दालनात कौतुकाचा वर्षाव झाला.