-->
आपला महाराष्ट्र 24

दिघोडे येथील ठाकूर परिवाराची जेजुरी यात्रा आणि देवांचा अभिषेक गोंधळ

 







उरण (सुनिल ठाकूर ). येळ कोट येळ कोट जय मल्हार. दिघोडे येथील ठाकूर परिवाराची जेजुरी सहळ मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 व बुधवार दिनांक 16 नोहेंबर 2022 या  दिवशॊ गेली होती. देव्हाऱ्यात जमून देव घेऊन 50 सीट च्या गाडीने   जेजुरीला निघाले. या प्रवासा दरम्यान   महड  येथील गणेशाचे. प्रति शिर्डी येथील साईबाबांचे. प्रति बालाजी. नारायण गाव येथील एकमुखी दत्त. मोरगाव येथील गणेशाचे दर्शन घेतले. संध्याकाळी जेजुरी येथे पोचल्यावर दर्शन घेऊन देवांचा अभिषेक व दुसऱ्या दिवशी गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. 

येळकोट येळकोट जय मल्हार करत बुधवारी संध्याकाळी देव घेऊन आल्यावर देवांची वाजत गाजत मिरवणूक हनुमान मंदिरापासून गावातून निघाली. होती. भंडारा उधळत फटाक्यांची आतष बाजी करत अक्षरशः डोळ्यांची पारणे फिरणारा हा आनंद दायी सोहळा होता.यावेळी ठाकूर परिवारातील अबाल वृद्ध. महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह पूर्ण आणि भक्तिमय वातावरणात देव देव्हाऱ्यात आणले व यावेळी आरती घेऊन सोहळ्याची सांगता झाली.


Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.