-->
आपला महाराष्ट्र 24

एनएमएमटी बस सेवा जुईनगर गव्हाण फाटा मार्गे वेश्वी दिघोडे ते कोप्रोली चालू करण्यासाठी दिले परिवहन विभागाला निवेदन

उरण (सुनिल ठाकूर ).
उरण रायगड दिघोडे, वेश्वी.विंधणे. ग्रामपंचायत कडून एनएमएमटी बससेवा चालू करण्यास नवी मंबई परिवहन अधिकार्‍यांनकडे मागणी चे निवेदन मंगळवार दिनांक ०७ जून २०२२ रोजी दाखल करण्यात आले.वाढत्या इंधन दर वाढीमुळे तसेच सीएनजी दर वाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागली असून पर्यायी मार्ग एनएमएमटी बस सेवा चालू करण्याचे , दिघोडे, वेश्वी.विंधणे ग्रामपंचायती कडून प्रस्ताव दाखल केल्यामुळे येथील नागरिकांत ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. पुढे बेलापूर रेल्वे स्टेशन वाशी बसस्थानक यांना ही जोडून या सेवेचा लाभ घेता येईल.एनएमएमटी बस सेवेचा फायदा प्रदूषण मुक्तीसाठी तर होणारच आहे त्याच बरोबर नागरिकांनचे प्रवास सुखकर होऊन त्यांच्या पैशांची बचत देखील होईल. इलेक्ट्रिक वातानुकूलित एनएमएमटी चा फायदा गावातील वयोवृद्ध, दिव्यांग, नोकरदार वर्ग, विद्यार्थी सर्वांना होणार आहे. सदर प्रस्ताव नवी मंबई परिवहन चे वरिष्ठ अधिकारी धर्मराज भगत यांच्या कडे शिवसेनेचे उरण पूर्व विभाग प्रमुख भूषण ठाकूर, उरण पूर्व विभाग सरचिटणीस रुपेश पाटील, पत्रकार सुनील ठाकूर, माथाडी कामगार संघटनेचे कार्यकर्ते शरद शेळके, तसेच दत्ता चौहान यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.