-->
आपला महाराष्ट्र 24

खारघर सेक्टर 12 येथील युथ फाउंडेशन अध्यक्ष सह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

  उरण (सुनिल ठाकूर ).
आज दिनांक १२ जून २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन तसेच युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या ३२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली व विभाग संघटक अजित घरत यांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर-१२ येथील युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा त्यांचे कार्यकर्ते तसेच डॉक्टर्स आणि उद्योजक यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला..
यावेळी महानगर समन्वयक दिपक घरत, शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, विभाग संघटक अजित घरत, दत्ता दळवी, सचिन पाटील, महिला आघाडीच्या तालुका संघटिका सौ. सुजाता कदम, उपमहानगर संघटिका सौ. रिना पाटील, शहर संपर्क संघटिका सौ. नंदा चेडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.