-->
आपला महाराष्ट्र 24

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या वतीने गरजू मुलांना खाऊ आणि शालेय साहित्य वाटप.

उरण (तृप्ती भोईर ).
     आज दिनांक ३/५/२०२२ मंगळवार रोजी रमजान ईद- अक्षय तृतीया हिंदू व मुस्लिम बाधवांचे पवित्र सण हिंदु संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे आजची 'अक्षय तृतीया' तर मुस्लिम बाधवांचा पवित्र असा रमजान महिन्यातील महत्त्वाची 'रमजान ईद' दोनही हे भारतीय सण राष्ट्रीय एकात्मता दर्शवत आहेत आज एकाच दिवशी साजरे होत आहेत. त्यामुळे या सणांच्या माध्यमातून समाजात एकता व बंधुता निर्माण करण्याचे कार्य करत आहे. 
    आणि याच हिंदु - मुस्लिम ऐकतेच्या सणाचे औचित्य साधून मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण यांच्या वतीने नागाव उरण येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल, खोडरबर इत्यादी शालेय वस्तू व केक, बिस्कीट पुडे, देऊन ज्ञानदानासोबतच खाऊ स्वरुपात अन्नदानही करण्यात आले.
    यावेळी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्था उरण चे अध्यक्ष विशाल पाटेकर, उर्जीत पाटील, सिध्दार्थ गाडे, विकास पाटेकर, , बादल म्हात्रे, गणेश पाटेकर, कुणाल शिसोदिया, रितेश गायकवाड, आदी सभासद उपस्थित होते.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.