उरण (सुनिल ठाकूर )
"मरावे परी किर्तीरुपे उरावे" या उक्तीप्रमाणे भेंडखळ येथील कै, लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीया तर्फे वृद्धा श्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सामाजिक , सांस्कृतिक व धार्मिक कार्यात नेहमी सहभागी असणारे भेंडखळ गावचे सुपुत्र व शिवभक्त स्वर्गीय लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून त्यांचा वारसा जोपासत मदत व सामाजिक बांधिलकी म्हणून रेशन सामान पनवेल नेरे येथील वृद्धाश्रम.,संगीता नितीन जोशी सामाजिक व विकास संस्था स्नेहकुंज आधार गृह येथे त्यांची मुलगी कु. प्रियांशी ठाकुर यांच्या हस्ते नितीन जोशी व अल्लाउद्दीन शेख सर यांच्या हाती सुपूर्त करून कै् लक्ष्मण रमण ठाकुर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त एका छोट्याश्या कार्याला सुरुवात केली. सोबत जरिमरी नवरात्रोत्सव मंडळ भेंडखळ व शिवप्रेमी ग्रुप भेंडखळ यांनीही योगदान दिले.
