-->
आपला महाराष्ट्र 24

छावा प्रतीष्ठान आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त छावा संघटनेकडून प्रदान करण्यात येणारा " जिल्हा स्तरीय छत्रपती संभाजी महाराज सामाजिक पुरस्कार "

 उरण (सुनिल ठाकूर ).
यावर्षी कोवीड कालावधीत कोवीड सेंटर पासून हकेच्या अंतरावर घर असतानाही नगरपरिषदेचे कर्मचारी श्री संतोष पवार, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस हे कोविड सेंटरमध्ये रात्रंदिवस "२४×७" राहून दिड वर्षात कोणतीही रजा अथवा सार्वजनिक सुट्टी न घेता सलग सेवा देण्याचे काम म्हणजेच कोविड रूग्णांना मानसिक आधार त्यांच्या नातेवाईकांना देखिल मानसिक आधार दिला आणि मनोभावे रुग्णांना सेवा केली हे करत असताना आपल्या स्वताच्या जीवाची अथवा कुटूंबाची परवा न करता खर्या अर्थाने अविरत सेवा दिली एवढेच नव्हे तर या कोविड सेंटरला आवश्यक असणारे पाणी , वीज , अनेक प्रकारचे साहित्य विविध प्रकारचे मेडिसीन अनेक कंपन्या तसेच मीत्र परिवार यांच्या कडून मिळविण्यासाठी मा. तहसीलदार श्री भाऊसाहेब अंधारे आणि वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर मनोज भद्रे , यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रा. राजेंद्र मढवी आणि वैद्यकीय कर्मचारी श्री. मोहन जगताप यांच्या सहकार्याने अथक प्रयत्न केले असे नगरपरिषदेमधील एक कर्मचारी श्री संतोष पवार यांच्या कार्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या पत्नी सौ प्रमिला पवार यांना या जिल्ह्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुसरे सत्कार मुर्ती आदिवासी समाजाच्या विकासासाठी आपले तन, मन , धन अर्पून ज्यांनी कोणतीही अपेक्षा न करता अविरतपणे विशेषतः मा जिल्हाधिकारी, श्री महेन्द्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेला कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत उरण , पनवेल, खानापूर, कर्जत, पेण , रोहा या तालुक्यातील कातकरी समाजाला जातीचे दाखले काढून देण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह उल्लेखनीय काम करत असलेले प्राध्यापक राजेंद्र मडवी सर तसेच कोविड कालावधीत अनेक डॉक्टरांनी सेवा देण्याचे बंद केले होते कालांतराने त्या सर्व डॉक्टरांनी सेवा सुरू केली परंतु ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची परवा न करता अतिशय माफक दरात सुरुवाती पासूनच आजपर्यंत ज्या डॉक्टरांनी अविरतपणे सेवा दिली अशा मोजक्या डॉक्टरांनपैकी एक डॉक्टर जे खऱ्या अर्थाने या कठीण परिस्थितीत समाजाला साथ देत आहेत डॉ. प्रकाश मेहता यांनाही आज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे माजी सैनिक प्रत्यक्ष सीमेवर राहून भारत मातेचे पर्यायाने आपले रक्षण करत होते असे माजी सैनिक श्री संतोष ठाकूर यांचाही आज सत्कार करण्यात आला समाजासाठी सर्वतोपरी योग्य वेळी योग्य अशी मदत करणारे व्यक्तिमत्वांचा सत्कार छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुभाष कडू आणि सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आयोजित केला.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.