उरण (सुनिल ठाकूर ).
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना पनवेल रायगड च्या वतीने २० मे ते २९ मे या कालावधीत दहा दिवसांचा "रयतोत्सव" 2022 शोध कलेचा शोध कलाकारांचा या स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अमेय खोपकर व कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पनवेल महानगर अध्यक्ष गणेश सरवणकर यांच्या वतीने करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश, दोन वर्ष पूर्ण काळात कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी नसल्यामुळे नवीन आणि जुन्या कलाकार यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंच उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे परत अशा कलाकरांना मुख्य प्रवाहात आणणे आणि यातून त्यांना पुढे दिशा मिळावी म्हणून चित्रपट सेना रायगड यांनी पुढाकार घेऊन या रयतोत्सव 2022 नावाने स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे.याविषयीची माहिती आज मनसे चित्रपट सेनेच्या वतीने देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अक्षय सुतार
महाराष्ट्र चित्रपट नवनिर्माण चित्रपट सेना उपाध्यक्ष श्री कल्पेश कोळी,
महाराष्ट्र चित्रपट नवनिर्माण चित्रपट सेना उपाध्यक्ष श्री अजय भोईर,महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनाजिल्हा सचीव गौरी गुजर जिल्हा चिटणीस वैभव घोडगे .महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना सचिव चंचला बनकर. आदी उपस्थित होते.
