-->
आपला महाराष्ट्र 24

विहान, इलेव्हन संघ ठरला दिघोडे प्रीमियर लिग चा विजेता तर विनय इलेव्हन उपविजेता

उरण (सुनिल ठाकूर ),

 दिघोडे येथील सर्वांचे लाडके प्रेमळ स्वभावाचे युवा नेतृत्व निलेश पाटील यांच्या वाढ दिवसा निमित्त नुकताच मयूर घरत आणि जयमातादी ग्रुप यांच्या तर्फे पहिल्यांदाच दिनांक 14 एप्रिल 2022 व 15 एप्रिल 2022 या दोन दिवसात शानदार दिघोडे प्रीमियर चे आयोजन करण्यात आले होते.

सदर सामन्यांचे उदघाटन दिघोडे गावच्या सरपंच सौ सोनिया मयूर घरत व नवी मुंबई नगरसेविका सौ मिरा संजय पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर ,माजी सरपंच एकनाथ माळी ,बाळाराम पाटील ,जयवंत म्हात्रे ,माजी सदस्य काशिनाथ पाटील ,बाळकृष्ण घरत ,बामा पाटील ,संदीप पाटील,पांडुरंग पाटील,राजेश पाटील,सुरेश पाटील ,नरेश कोळी ग्रामपंचायत सदस्य सौ कविता म्हात्रे ,श्री प्रफुल पाटील ,श्री कांचन घरत ,श्री शरद कोळी आदी उपस्थित होते सदर स्पर्धे मध्ये विहान इलेव्हन ठरला दिघोडे प्रीमियर लिग चा विजेता तर विनय इलेव्हन उपविजेता ठरला तर मालिकावीर चा बाईक का मानकरी ठरला तो विनय इलेव्हन चा निवृत्ती पाटील ,उत्कृष्ठ गोलंदाज ठरला तो विहान इलेव्हन चा वेदांत वाणी तर उत्कृष्ठ फलंदाज विहान इलेव्हन चा योगेश कोळी ठरला.

या सामन्यांचे शानदार निवेदन शाम ठाकूर यांनी केले तर पंचांची कामगिरी द्वारकानाथ चोरघे व दिपक पाटील यांनी पार पाडली तर समालोचन आकाश शेळके, प्रवीण गायकर ,सुरज पाटील यांनी केले तर गुण लेखक श्रीकांत कोळी शरद कोळी ,मंदार पाटील ,कुलदीप म्हात्रे यांनी काम पाहिले या दोन दिवसीय सामन्यां च्या वेळी उरण आमदार महेश शेठ बालदी ,तालुका अध्यक्ष रवी भोईर ,पनवेल महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती सभापति तथा नगरसेवक श्री. प्रविण दादा पाटिल,उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा ,नगर सेवक राजू ठाकूर ,वैश्वि चे माजी सरपंच अजित पाटील ,जासई विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे ,प्रसाद दादा पाटील ,युवक अध्यक्ष तेजस पाटील, तेजस डाकी (उदोज़क बोरख़ार)गव्हाण चे उपसरपंच सचिन घरत ,वेद इंटर प्राजेस चे राजेंद्र शेठ फडके ,गिजेंद्र शेठ फडके ,सोमनाथ फडके ,राजेश फडके ,मयूर भाई चिखलेकर संदीप पाटील (कुकशेत),विनायक धोतरे प्रितम तांबडे ,प्रवीण माने ,अंजुर भिवंडी चे उपसरपंच केतन शेठ तरे, सुनिल घरत ,कार्तिक इंटर प्रायजेस चे सुभाष शेठ पाटील ,विशाल चित्रे ,अंकुश माळी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.




Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.