-->
आपला महाराष्ट्र 24

शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती कृषी पदवीधर बदलू शकतात..

 


मुरुड हायस्कूलचे पी.टी.टीचर आरेकर सर...

मुरुड -03 एप्रिल राजीव नेवासेकर

कृषी पदवी घेऊन पहिला काम उत्कर्षने जर का केला असेल ते म्हणजे कृषी केंद्रचा.उत्कर्ष या नावातच खरी उन्नती आणि उदय आहे.खर म्हणजे महाडिक कुठूबीयांची नावेच पहा वडीलांचा नाव उदय आईचे उन्नती तर बहीणीचे उर्जिता ज्यांच्या संकल्पनेतून कृषी केंद्राचे उद्घाटन होत आहे तो उत्कर्ष ही नावे सांगून जात आहेत की शेतकऱ्यांना काय हवे जर का कृषी पदवीधर शेतकऱ्यांच्या जोडीला मिळाला तर शेतकऱ्याची परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन मुरुड हायस्कूलचे प्रख्यात पी.टी.शिक्षक आरेकर सर यांनी केले.

मुरुड तालुक्यातील विहुर या गावी श्री समर्थ कृपा उत्कर्ष कृषी केंद्राचे उद्घाटन श्री रघुनाथ कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व प्रतिमेचे पूजन तसेच फित कापून करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी रायगड स्वाभिमान न्यूज टाईम्सचे संपादक तथा माहिती अधिकार महा संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री रघुनाथ कडू, इकरार मोदी, सोनावणे सर,अशोक सानप,आरेकर सर,डोंगरीकर, ठाकूर टिटमाला हल्डे,चौलकर सर जगताप सर,बिलार खोपकर,रुपेश जमादार, गजानन पाटील, पांडूरंगशेट कडू, चंद्रकांत बुल्लू, विशेष मरवडे, कृष्णा पाटील,वडके, मंगेश बोंडेकर मिलिंद खांबकर,अक्षय पाटील,भोरबे सर,नईम पंगारकर,मेहमुद उळडे उदय दांडेकर,,मुसरद उळडे काशिनाथ पाटील, उपस्थित होते.

श्री समर्थ कृपा उत्कर्ष कृषी सेवा केंद्रामागे माझे उद्दीष्ट असे आहे की सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची संकरीत व सर्टीफाईड बी- बियाणे तसेच रासायणीक खते, किटकनाशके, कृषी औजारे आपल्या येथे स्वल्प दरात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.आता शेतकऱ्यांना होणारी गैरसोय व अपुरे मार्गदर्शन त्याची पुर्ण माहिती व सहकार्य हे माझ्याकडून केले जाईल आता त्याकरिता पायपीट करावी लाणार नसून या केंद्राची जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार हा करण्यात यावा अशी माझी विनंती आहे.

मला मिळालेल्या शेतीचा ज्ञान मी माझ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्यासाठी प्रयत्न करुन शेतकरी शेतीकडे कसा आकर्षित होईल या साठी मी प्रयत्न करेन असे उत्कर्ष महाडिक यांने आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात रघुनाथ कडू यांनी सांगितले की उत्कर्षने अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला असून याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल, मुरुड तालुका हा पर्यटन क्षेत्र घोषित असल्याने पुणे मुंबई सह संपुर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचा ओघ जास्त मुरुड सारख्या ऐतिहासिक स्थळाकडे आहे.त्यामुळे हरितक्रांती होणे गरजेचे असल्याने उत्कर्ष च्या बरोबरच तरुण वर्गाने शेतीविषयक माहिती घेऊन शेतीकडे वळले पाहिजे.उत्कर्षला शेतीबरोबरच जोडशेतीचा चांगला अनुभव आहे त्यांनी त्यांच्या आजोबांकडे शेळी,कुकूट पालन यशस्वी करुन दाखवले आहे त्याचा त्याला चांगला अनुभव आहे म्हणून शेतकऱ्यांनी खचून न जाता शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून सल्ला घेऊन शेतीतच विविध पिके घेतली तर फायदा आहे.आज उत्कर्ष कडे काही नसतांना त्यांने शेती हा विषय निवडून यशाकडे वाटचाल आहे पण ज्यांच्या कडे वडीलोपर्जीत शेती कय पटीने असुन आजचा तरुण नोकरीच्या शोधात आहे याची खंतही वाटत आहे.असे बोलून तरुणांना शेतीविषयक मौलिक सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सुरुवातीला पाहुण्यांचे आदरातिथ्य स्वागत करुन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हा सत्कार उत्कर्ष व त्याचे वडील उदय महाडिक यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरेकर सरांनी केले व उपस्थितांचे आभार यजमान श्री उदय रामचंद्र महाडिक यांनी केले.यावेळी दामोदर बांद्रे,शुभाष दळवी, अरविंद दळवी, संतोष पोटले,अजय वायकर, महेंद्र कदम,रुपेश बांद्रे, मंगेश दांडेकर, नितीन पवार, रविंद्र महाडिक,सुशिल खोपकर,कांगणे मामा,अमित महाडिक, महेंद्र चौलकर,मनोज भगत,स्वागत बुल्लू,रोहन कडू,रोशन कडू, ग्रामस्थ व महिला वर्ग यावेळी हजर राहिल्या होत्या.

Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.